Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

‘देऊळबंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’चे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

पुणे, दि. 17 – प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे सोमवारी निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते.  दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा गाजलेल्या ‘देऊळबंद’ , ‘मुळशी पॅटर्न’ आणि आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची गीते तसेच अनेक मालिकांचे शीर्षक गीते कुलकर्णी यांनी लिहिली आहेत. 

प्रणित कुलकर्णी यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, आणि भाऊ असा परिवार आहे. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4197977490223494&id=100000338537393

प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुकवर भावूक पोस्ट लिहून प्रणित कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते आपल्या पोस्ट मध्ये लिहितात की, माझा प्रणीत दादा गेला… ,सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला,,,गेला. कायमचा..गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही…नंतर सविस्तर लिहिनच.. देवूळबंदला माझ्या सोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळवंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गीतकार…. अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरित्राचे कर पारायण,.. हंबीर तु खंबीर तु अशा एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला… कायमचा.

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading