Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

युवकाच्या खुन प्रकरणी सहा जणांना जन्मठेप

पुणे : युवकावर कोयत्याने वार करीत तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड तसेच दंङ न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सञ न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला.

बापु शिवाजी कांबळे (वय 46), सुरज नारायण माने (वय 25) विजय सुरेश गुंङ (वय 25), दिलीप गजेंद्र सोनवणे (वय 44) संतोष दामु सुतार (वय 33, सर्व रा. अप्पर ओटा, इंदिरानगर, बिबवेवाङी) आणि अमित हिरामण धोञे (वय 27,रा. पर्वती पायथा, दांडेकर पूल) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दीपक श्रीमंत सकट ( वय 24, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) याचा खून झाला असून याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बिबवेवाडीतील अप्पर महालक्ष्मी मंदिराजवळ दि. 9 मार्च 2014 रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक एम. बी. खंङाळे यांनी आरोपींविरुद्ध दोषारोप न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरेपाटील यांनी 13 साक्षीदार तपासले, त्याकामी त्याना बिबवेवाङी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सजंय पुणेकर यांनी सहाय्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading