Tuesday, June 16, 2026
Business

‘व्हिटेरो टाईल्स’ने आपला उत्पादन पोर्टफोलिओ केला बळकट, वॉल टाईल्सच्या 56 नवीन शेड्स भारतभरातील बाजारपेठांत सादर

 ‘अपर्णा एन्टरप्रायजेस’ या बांधकाम साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँडने, ‘व्हिट्रा’ नावाच्या ‘वॉल टाइल्स’चे नवे कलेक्शन आज सादर केले आणि त्यायोगे आपल्या ‘व्हिटेरो टाईल्स’ या टाईल ब्रॅंडच्या व्यवसायवाढीचे धोरणही जाहीर केले. प्रीमियम गुणवत्ता, आधुनिक डिझाइन आणि समकालीन सौंदर्यशास्त्र याद्वारे प्रेरित असलेल्या ‘व्हिट्रा टाईल्स’च्या नवीन मालिकेमध्ये छप्पन छटा उपलब्ध असणार आहेत. या नवीन सादरीकरणासह, कंपनीच्या वॉल टाईल्सच्या पोर्टफोलिओमध्ये आता सुमारे 4 मालिका असतील आणि त्यांतून 400 पेक्षा जास्त शेड्स उपलब्ध होतील. ‘व्हिट्रा’ ही मालिका संपूर्ण भारतात 275 हून अधिक वितरकांमार्फत उपलब्ध होईल.

‘अपर्णा एंटरप्राईजेस लि.’चे व्यवस्थापकीय संचालक अश्विन रेड्डी यांनी आपल्या उत्पादनांचा विस्तार आणि विकासाच्या योजना यांबद्दल या प्रसंगी भाष्य केले. ते म्हणाले, “गेल्या वर्षी अनेक आव्हाने असूनही ‘व्हिटेरो टाईल्स’चा मागील आर्थिक वर्षातील व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढला. चालू आर्थिक वर्षात त्यात 50 टक्क्यांपर्यंतची वाढ अपेक्षित आहे. आमच्या नवीन सादरीकरणातून ग्राहकांना उच्च प्रतीची आणि प्रीमियम डिझाइनची उत्पादने मिळणार आहेत. पोर्टफोलिओ वाढविण्याव्यतिरिक्त, आम्ही टाइल्सची उत्पादन क्षमता व वितरकांचे देशभरातील जाळे यांचा विस्तार करण्याचे काम सुरू ठेवू. मागील वर्षी आम्ही आमचे वितरकांचे जाळे 23 टक्क्यांनी वाढवले होते, यावर्षी आम्ही ते आणखी 30 टक्क्यांनी वाढवू.”

‘व्हिट्रा टाईल्स’मध्ये स्टाईल व उपयुक्तता यांचा अचूक संयोग साधण्यात आला आहे. या टाईल्समध्ये अतिशय तेजस्वी, विरोधाभासी असा अनोखा पृष्ठभाग मिळतो. रंगांच्या पन्नासहून अधिक छटांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या टाईल्सची मालिका आंध्र प्रदेशातील पेड्डापुरम येथील अत्याधुनिक कारखान्यात प्रगत ‘नॅनो-तंत्रज्ञाना’च्या आधारे बनविण्यात येत आहे. या टाईल्ससाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा मालापैकी चिकणमाती व फील्डस्पार यांच्यासारखा 60 टक्के माल हा ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ प्रक्रियेतून कंपनीच्या आवारातच बनविण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक उत्पादनात एकसमान सुसंगतता आणि गुणवत्ता मिळते. प्रगत पॉलिशिंग युनिट्सचा वापर करून या मालिकेतील प्रत्येक टाईलमध्ये चमक, पृष्ठभाग सुसंगतता आणि टिकाऊपणा या गोष्टी आणल्या जातात. प्रकाश पडला असता, या टाईल्स चमकतात. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी ‘विट्रा’ ही एक आदर्श निवड आहे. भारतभर उपलब्ध असलेल्या या टाईल्स 300x 300 मिमी आणि 300x 600 मिमी या आकारात मिळतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading