Saturday, May 30, 2026
Business

आयसीआयसीआय बँकेतर्फे ‘मर्चंट स्टॅक’ लाँच

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज मर्चंट स्टॅक हा व्यापाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आलेला देशातील सर्वयोग्यसर्वसमावेशक डिजिटल बँकिंग सेवा सेट लाँच करत असल्याचे जाहीर केले. यातील डिजिटल बँकिंग आणि मूल्यवर्धित सेवा व्यापाऱ्यांना – किराणामालकसुपर मार्केट्समोठ्या रिटेल दालनांची साखळीऑनलाइन व्यवसायमोठ्या ई- कॉमर्स संस्था यांना बँकिंगविषयक गरजा सहजपणे पूर्ण करता येतात. शिवायत्यांना सध्याच्या महामारीच्या आव्हानात्मक काळात आपल्या ग्राहकांना अखंड सेवा देता येते. हा उपक्रम बँकेच्या बिझनेस विथ केयर या तत्वाशी सुसंगत राहात तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांना विशेषतः व्यवसायात प्रथमच उतरत असलेल्यांना बँकेच्या शाखेला भेट न देतासुरक्षित अंतर राखण्यासाठी व घरी असलेल्या नागरिकांना संपर्कविरहीत सेवा देणे शक्य झाले आहे. त्यांना बँकेने व्यवसायांसाठी खास तयार केलेल्या इन्स्टाबिझ या मोबाइल अपवर या सुविधांचा तत्काळ वापर करता येईल –

 

‘मर्चंट स्टॅक’ ही सेवा रिटेलर इको- सिस्टीमसाठी विविध प्रकारच्या बँकिंग सेवा आणि मूल्यवर्धित सेवा ‘एकाच ठिकाणी’ देते. या स्टॅकचे मुख्य स्तंभ आहेत – 1) ‘सुपर मर्चंट करंट अकाउंट’ नावाचे नवे खाते 2) पीओएस व्यवहारांवर आधारित आणि या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आलेल्या ‘मर्चंट ओव्हरड्राफ्ट’ आणि ‘एक्सप्रेस क्रेडिट’ या दोन नव्या क्रेडिट सुविधा 3) व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय ऑनलाइन पातळीवर नेण्यासाठी मदत करणारी ‘डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट’ सुविधा 5) ऑनलाइन कामकाजाचा विस्तार करण्यासाठी प्रमुख ई- कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म्सबरोबर सहकार्य करण्यासारख्या मूल्यवर्धित सेवा

या लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेचे श्री. अनुप बागची म्हणाले, ‘स्वयं- रोजगार मिळवणाऱ्या व्यक्ती आणि एमएसएमई क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असा आमचा ठाम विश्वास आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने रिटेल व्यापाऱ्यांचा समावेश होतो. भारता 2 कोटी व्यापारी आहेत आणि 2020 मधे अंदाजे 780 अब्ज मूल्याचे व्यवहार झाले आहेत. येत्या काही वर्षांत ही संख्या वेगाने वाढेल असा अंदाज आहे. महामारीच्या या आव्हानात्मक काळात व्यापाऱ्यांना डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म पुरवून त्यांना आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी मदत करणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच आम्ही ‘मर्चंट स्टॅक’ ही सेवा लाँच केली आहे, जी संपर्कविरहीत बँकिंग सेवांची श्रेणी आणि पर्यायाने व्यापारी तसेच ग्राहकांना सुरक्षा पुरवते. ही सुविधा वर्षभरापूर्वी लाँच केलेल्या ‘आयसीआयसीआय स्टॅक’ या सुविधेसारखीच असून ती रिटेल ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व डिजिटल बँकिंग सेवा देते.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading