Saturday, June 13, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी ६१ हजार १८१ कोरोना मुक्त, ९८५ जणांचा मृत्यू

मुंबई, दि. २८ – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या नव्या नोंदणीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती परंतु आता नव्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ६३ हजार ३०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली असून मागील २४ तासात ९८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १.५% एवढा आहे. तसेच आतापर्यंत ३७ लाख ३० हजार ७२१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात एकाच दिवशी ६१ हजार १८१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८३. ४ टक्क्यावर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६५,२७,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,७३,३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७३,४८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झाली आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट्स

  • दिवसभरात ३९७८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४९३६ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ८५ रुग्णांचा मृत्यू. २७ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१०५०४.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४०५९.
  • एकूण मृत्यू -६६६९.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३५९७७६.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०२७७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading