fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात शनिवारी ६७ हजार १६० नवीन रुग्ण; ६७६ जणांचा मृत्यू

मुंबई, दि. २४ – राज्यात शनिवारी ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७१, रायगड २०, नाशिक ३५, अहमदनगर ३०, पुणे २२, सोलापूर ४८, सातारा २३, रत्नागिरी २५, हिंगोली ११, लातूर २९, उस्मानाबाद १२, बीड २८, नांदेड ६१, अमरावती १०, यवतमाळ २५, नागपूर ५७, वर्धा २०, भंडारा २५, गडचिरोली २२ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.

मुंबईत शनिवारी ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १४६ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात ३९९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४७८९ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. १९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९५४८६.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९४७२.
  • एकूण मृत्यू -६४४३.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३९५७१.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२२७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading