विनायक नवयुग मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट व भाजपा पुणे शहर यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन यावेळी रक्तदान केले. ४७ पिशव्या रक्ताचे संकलन करुन दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ब्लड बँकेला संकलित रक्त देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, सामाजिक समूह प्रमुख व शिक्षण समूहाचे प्रमुख धनंजय काळे, दिलीप हर्डीकर, डॉ.सचिन देशपांडे, ज्येष्ठ उद्योगपती चंद्रवदन दाते, महेंद्र धावडे, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष सुनिल पांडे, भाजप शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, भाजप शिवाजीनगर माजी अध्यक्ष नरेंद्र (नाना) मोरे, रक्तदान कार्यक्रमाचे समन्वयक समीर हळंदे, ऋषिकेश आर्य, वरूण जकातदार, अक्षय शहाणे, ऋषिकेश आर्य, विक्रम मोरे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनिल पांडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करायला हवे. कोरोनापेक्षा माणुसकीचे नाते मजबूत आहे, हा संदेश देण्यासाठी विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० पेक्षा अधिक तरुणांनी रक्तदान केले.