Saturday, June 13, 2026
PUNE

समाज कल्याण आयुक्तांकडून शहरातील वसतीगृहांना भेटी साफसफाई ,स्वच्छता व सुरक्षेचा घेतला आढावा

पुणे दि२२: राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सद्यस्थितीत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय विभागाची शासकीय वसतीगृहे ही आहे आधार केंद्र बनली आहेत. अशा सर्व वसतिगृहांमध्ये साफसफाई स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने पुणे शहरातील शासकीय वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज साफसफाई, स्वच्छता व सुरक्षेचा कामांचा आढावा घेतला.

आयुक्त नारनवरे यांनी शहरातील येरवडा येथील संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह, गोल क्लब येथील मुलांचे शासकीय वसतिगृह, क्वीन्स गार्डन येथील मुलींचे संत जनाबाई शासकीय वसतिगृह, येरवडा येथील मुलांच्या निवासी शाळा परिसरातील मुला- मुलींचे शासकीय वसतिगृह, तसेच येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन बाह्यस्रोतद्वारे विविध कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या साफसफाई, स्वच्छता व सुरक्षेचा कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे सूचित केले. तसेच उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती घेतली व साफसफाई स्वच्छते व सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत श्री प्रशांत चव्हाण उपायुक्त (प्रशासन) समाज कल्याण आयुक्तालय, श्री विजय कुमार गायकवाड सहाय्यक आयुक्त, श्रीमती संगीता डावकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, संतोष जैन गृहपाल यांच्यासह विभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading