माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोना पॉझिटिव्ह; AIIMS मध्ये दाखल
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सायंकाळी म्हणजे 19 एप्रिलला रीपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्सच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची लवकरात लवकर चाचणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी 4 मार्चला एम्समध्ये कोरोनाची पहिली लस घेतली आहे. म्हणून अशी आशा आहे की, ते सहजपणे कोरोनाला हरवू शकतील आणि लवकरच त्यांची प्रकृती चांगली होईल. मिळालेल्या माहितीनुसार 88 वर्षीय मनमोहन सिंग यांना हृदयविकाराचा आजार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत चांगल्या उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले आहे.
