कोरोना – आज राज्यात ५८ हजार ९२४ नवीन रूग्ण तर ३५१ जणांचा मृत्यू
मुंबई : आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ३५१ करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आकडा कमी होत आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर २७,०८१ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील वाढतेय. पण तुलनेत लसीकरणाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. मुंबईत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आलीय. या केंद्रावर लोकांच्या रांगा देखील पाहायला मिळतायत. पण याठिकाणी लसटंचाई जाणवू लागलीय. लसीकरणाच्या वेगावर याचा परिणाम होतोय. रविवारी तब्बल ३५ खासगी केंद्रांनी लस साठय़ाअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. त्यामुळे दिवसभरात अर्ध्या संख्येने म्हणजेच 27 हजार 189 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पुणे शहर अपटेड
- दिवसभरात ४५८७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ६४७३ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ७६ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १२६७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३७१८२४.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६९६.
- एकूण मृत्यू -६१६३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३१०९६५. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०८८९.
