Saturday, May 30, 2026
MAHARASHTRANATIONALTOP NEWS

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे NEET परीक्षाही पुढे ढकलली

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे देशात रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. अनेकांचा मृत्यू होतोय. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा घातक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचा मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच कारणामुळे देशभरात विविध राज्यांतर्गत तसेच राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बऱ्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएससी बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षेसंदर्भात एवढे सारे निर्णय होत असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडूनसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करुन केंद्राने द्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलली आहे. नियोजित वेळेप्रमाणे ही परीक्षा येत्या 18 एप्रिलला होणार होती.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं. तसेच, सध्याच्या महामारीचा अभ्यास करुनच परीक्षेची आगामी तारीख ठरवली जाईल, असेसुद्धा त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला NEET PG 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केल्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading