Friday, September 4, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात गुरुवारी ६१ हजार ६९५ नवीन रुग्ण

मुंबई – कोरोनाला थोपविण्यासाठी बुधवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज या संचारबंदीला १ दिवस पूर्ण झाला आहे. पण राज्यात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ८७ हजार ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजरोजी एकूण ६ लाख २० हजार ६० Active रुग्ण आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात 5395 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 4321 रुग्णांना डिस्चार्ज.
  • कोरोनाबाधीत 49 रुग्णांचा मृत्यू. 19 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 1172 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 349424

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 54351

  • एकूण मृत्यू – 5951

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 289122

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 21922

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading