Friday, June 19, 2026
PUNE

एम.सी.ई. सोसायटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे :  ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने  अध्यक्ष डॉ पी.ए.इनामदार यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅम्पमधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून १४ एप्रील रोजी  सकाळी अभिवादन करण्यात केले . यावेळी मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष एस ए इनामदार ,हाजी गुलाम महंमद आझम एजुकेशन ट्रस्ट चे विश्वस्त अब्दुल वहाब ,मजीद सय्यद तसेच आझम स्पोर्ट्स अकादमी चे संचालक गुलझार शेख उपस्थित होते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक कोरोना साथीच्या पार्श्व भूमीवर रद्द करण्यात आली.  ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे , संस्थेचे सचिव डॉ लतिफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. दहा हजार विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading