Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी ५९ हजार नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून गेल्या काही दिवसांपासून नियमित ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ होत आहे. आज राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यातच, आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचे रुग्ण होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण सापडले. तर, आज २७८ मृतांची नोंद झाली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० झाला आहे. यामध्ये ६ लाख १२ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आज ३९ हजार ६२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आलं आहे. आतापर्यंत २ कोटी २८ लाख २ हजार २०० नमुन्यांपैकी ३५ लाख ७८ हजार १६९ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या २८ हजार ४९४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पुणे शहर

  • दिवसभरात ४२०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४८९५ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ११५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४४०२९.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५३३२६.
  • एकूण मृत्यू -५९०२.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २८४८०१.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१३२

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading