Saturday, September 5, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात रविवारी ६३ हजार २९४ नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात कोरोनाचा वेग अतिप्रचंड गतीने वाढत जातोय. गेल्या आठवड्यापासून ५० ते ६० हजारांच्या घरात सापडणारी रुग्णसंख्या आता ६३ हजारांच्याही पार गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६३ हजार २९४ रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिभयंकर रुप धारण करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतोय. आज ६३ हजारांनी रुग्ण वाढले असून तब्बल ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्याही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. त्यातच, रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलटर बेड्सची कमतरता जाणवायला लागली आहे. शिवाय, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने या इंजेक्शनसाठीही नातेवाईकांची दमछाक होतेय. त्यामुळे येणाऱ्या काळात सुखरुप राहायचं असेल तर नागरिकांना काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे.

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे राज्यात एकूण बाधितांचा आकडा ३४ लाख ७ हजार २४५ वर पोहोचला आहे. तर, यापैकी २७ लाख ८२ हजार १६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५७ हजार ९८७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे. यामुळे सध्या राज्यात ५ लाख ६५ हजार ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत आज ९ हजार ९८९ रुग्णांची वाढ झाली आहे, तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २ हजार ४०५ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच, ठाण्यातही 1 हजार 711 रुग्णांची वाढ झाली आहे.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात 6679 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 4628 रुग्णांना डिस्चार्ज.
  • करोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू. 10 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 1045 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 329661

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 52476

  • एकूण मृत्यू – 5748

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 271437

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 24773

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading