Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNE

शालेय विद्यार्थी मारहाण प्रकरणी पतित पावन संघटनेतर्फे भारती विद्यापीठला निवेदन

पुणे : भारती विद्यापीठच्या पाचगणी महाबळेश्वर येथील गॉड्स व्हॅली मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पतित पावन संघटनेतर्फे पुण्यातील भारती विद्यापीठाच्या मध्यवर्ती कार्यालयात संचालकांना सदर प्रकरणात दोषींवर निलंबनाची कारवाई करा, या मागणीसाठी संघटनेच्या पुणे शहराच्या पदाधिका-यांनी निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगे, पुणे शहराचे संपर्कप्रमुख गुरुभाऊ कोळी, स्वप्नील नाईक व विजय गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वप्नील नाईक म्हणाले, पाचगणीतील भारती विद्यापीठाच्या गॉड्स व्हॅली शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असूून, दोषींचे संस्थेतून निलंबन करावे, अशी मागणी पतित पावन संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading