Tuesday, June 16, 2026
BusinessPUNE

सतीश मगर आता क्रेडाई राष्ट्रीयचे चेअरमन

– शातीलाल कटारिया यांची  क्रेडाई राष्ट्रीय च्या उपाध्यक्षपदी निवड

– क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी आता क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करणार 

पुणे, दि. ३० – क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे बरेचसे पदाधिकारी आता क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करणार आहेत. आज ऑन लाईन पद्धतीने झालेल्या समारंभादरम्यान संबंधित घोषणा करण्यात आली.  प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक सतीश मगर यापुढे क्रेडाई राष्ट्रीयचे चेअरमन म्हणून काम पाहतील तर पुण्यातील शांतीलाल कटारिया यांची क्रेडाई राष्ट्रीयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

क्रेडाई अर्थात काँफीडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसियेशन ऑफ इंडिया हि बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. ही निवड २०२१ ते २०२३ या दोन वर्षांसाठी आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे काही सदस्य आणि पदाधिकारी आता राष्ट्रीय स्तरावरील काही समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये सुहास मर्चंट (आकडेवारी आणि मानके), जे. पी. श्रॉफ (कौशल्य विकास) मनीष कनेरिया (पर्यावरण), आय. पी. इनामदार (कायदेशीर बाबी) या समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील तर कपिल गांधी (जनसंपर्क आणि प्रसिद्धी) समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करतील. 

या विषयी बोलताना शांतीलाल कटारिया म्हणले, “क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात यापुढे क्रेडाई  राष्ट्रीय साठी काम करणार आहेत ही महाराष्ट्रसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या याआधीच्या जवाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत ही बाब अधोरेखित होते. मला खात्री आहे कि यापुढेही हे सर्व पदाधिकारी  क्रेडाई  राष्ट्रीय साठी काम करताना नवे मापदंड प्रस्थपित करतील.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading