Saturday, June 13, 2026
PUNE

संगीता ललवाणी यांची जितो महिला आघाडीच्या महाराष्ट्र विभाग संयोजक पदी नियुक्ती

पुणे, दि. २४ – पुण्याच्या संगीता ललवाणी यांची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या महिला आघाडीच्या (जेएलडब्लू) महाराष्ट्र संयोजक (आरएमओ झोन कन्व्हेनर) पदी नियुक्त करण्यात आलेली आहे.

मुंबई येथे मुख्यालय असलेली जितो ही जैन समाजाची एक जागतिक व्यापार संघटना असून देशभरातली अनेक व्यावसायिक, उद्योगपती हे याचे सभासद आहेत. संस्थेचे भारतात ६७ तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तब्बल ११ चॅप्टर्स असून त्यांचे १४ हजारांहून अधिक सभासद आहेत. समाज बांधवांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण करणे, त्यांना मूल्याधारित शिक्षण देणे, सामाजिक कल्याण व आध्यात्मिक समाधान यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे आदी क्षेत्रात संस्था कार्यरत आहे.

संगीत ललवाणी या सध्या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (फ्लो) च्या राष्ट्रीय प्रशासकीय मंडळाच्या सदस्या असून, रोटरी ३१३१ च्या सहाय्यक गव्हर्नर म्हणून देखील काम पहात आहेत. याशिवाय ललवाणी या सार्क चेंबर वुमेन एन्त्रप्रिनर्स काउंसिल (SCWEC) च्या आंतरराष्ट्रीय परिषद सदस्या व पुण्यातील गोल्ड मार्ट ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका देखील आहेत. आपल्या नियुक्ती संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “जितोच्या महिला विभागाच्या महाराष्ट्र संयोजक पदी काम करीत असताना समाजातील जितो च्या उद्दिष्टांप्रमाणे  जैन महिलांचे सबलीकरण करीत त्यांना स्वत:च्या क्षमता ओळखण्यास मदत करण्यावर मी भर देणार आहे. याबरोबरच जितो महिला आघाडी अर्थात जेएलडब्लूच्या राज्यभरात शाखा सुरु करण्यासाठी देखील मी प्रयत्नशील असणार आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading