Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENT

स्टार प्रवाहच्या कलाकारांची सोशल मीडियावर धूम

स्टार प्रवाहवरील मालिकांमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखिल कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.

यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनी सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार पटत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्याजोगी होती. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखिल सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला. सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली. गौरी प्रमाणेच मुलगी झाली हो मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखिल यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला. या सर्व व्हिडिओंना स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत. इतर माध्यमांवर देखिल हे व्हिडिओज भरभरुन व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading