Saturday, May 30, 2026
PUNE

PMP कात्रज आगार च्या वतीने डॉ. राजेंद्र जगताप व संचालक शंकर पवार यांचा सत्कार

पुणे, दि. ४ – पीएमपीएमएलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणेसाठी संचालक मंडळाची मान्यता घेतल्याबद्दल तसेच वाहतूक व वर्कशॉप विभागातील ४८१ कामगारांना बढती देऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला बढतीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल व १२१४ बदली कामगारांना कायम केल्याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व संचालक शंकर पवार यांचा सत्कार कात्रज आगारात छत्रपती राजे प्रतिष्ठाण, कात्रज आगार वर्कशॉप विभाग व सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आला. कात्रज आगारात भव्य सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, आगार अभियंता सचिन वाबळे, छत्रपती राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कल्याण गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, कामगारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कामगार हिताचे निर्णय घेत आहे. अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा प्रश्नही ताबडतोब मार्गी लावणार आहे. इ बस चार्जिंगसाठी सौरऊर्जेचा वापर करून वीजबिल खर्चात बचत करणार आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक बचत होऊन उत्पन्न वाढीस मदत होणार आहे.

पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार म्हणाले, महामंडळाचे पदाधिकारी या नात्याने कामगारांचे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. कामगारांनी देखील खात्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. ब्रेकडाऊन कमी व्हावेत यासाठी काळजी घेऊन प्रवाशांना चांगली सेवा कशी मिळेल यासाठी सतत प्रयत्नशील रहावे.
संदिप पायगुडे व सुभाष मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. आगार अभियंता सचिन वाबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading