Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

मुंबई, दि. 3 – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी बरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे. मुंबईत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू असल्याचे कळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading