सोनी YAY! ‘किकुम्‍बा’सह सर्व लहान मुलांना विलक्षण साहसी प्रवासावर घेऊन जाण्‍यास सज्‍ज

लोकप्रिय किड्स एंटरटेन्‍मेंट चॅनेल सोनी येय! लहान मुलांसाठी रोअरिंग व्‍यक्तिमत्त्व असलेला त्‍यांचा नवीन जिवलग मित्र ‘किकुम्‍बा’सादर करण्‍यास सज्ज आहे. २२ फेबुवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० वाजता लहान मुलांच्‍या सोबतीला किकुम्‍बा दि लायन असणार आहे, जो त्‍यांना त्‍याच्‍याविलक्षण आव्‍हाने व हास्‍यजनक घटना/ संघर्षांकडे घेऊन जाईल. आनंदी सिंह – किंग किकुम्‍बा लहान मुलांना भव्‍य जंगलामध्‍ये घेऊन जाईल, जेथे त्‍यांना रोज हास्‍यजनक घटना व मजेशीर आव्‍हाने पाहायला मिळतील.

कथानक एका जंगलामधील घडामोडींबाबत आहे, जेथे हजारो वर्षांतून एकदा साम्राज्‍यातील सर्व प्राण्‍यांना जंगलाचा भावी सम्राट बनण्‍यासाठी त्‍यांच्‍या राजाविरोधात सामना करण्‍याची संधी मिळते. पण यावेळी सम्राटला हरवण्‍याचा टास्‍क किंग किकुम्‍बा या सिंहावर असतो. त्‍याला झोपायला आणि काहीसे अधिक आराम करायला आवडते. साम्राज्‍यातील धूर्त प्राणी त्‍यांच्‍या खोडकरपणामध्‍ये यशस्‍वी होतील का? साम्राज्‍य जिंकण्‍यासाठी किकुम्‍बा कोणता नवीन स्‍टण्‍ट वापरेल? किकुम्‍बाची हास्‍यजनक कृत्‍ये आणि जंगलाच्‍या धूर्त प्राण्‍यांशी सामना करण्‍याकरिता त्‍याचे शक्तिशाली उपाय पहा या आठवड्यात सोनी येय! वर.

चॅनेलने या वर्षाच्‍या सुरूवातीला लहान मुलांसाठी विनोदी साहसांनी भरलेले दोन शोज देखील सादर केले होते बॅककोम आणि ऑस्‍कर अब बस कर‘. यामुळे मुलांसाठी येय! च्‍या कॉमेडी विश्‍वामध्‍ये वाढ झाली आहे.

येय! च्‍या कॉमेडी विश्‍वामधील नवीन भर किकुम्‍बा पहा २२ फेब्रुवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० वाजता फक्‍त सोनी येय! वर. मजेशीर, वैविध्‍यपूर्ण व अद्भुत येय! टून्‍सच्‍या विश्‍वाबाबत जाणून घेण्‍यासाठी, तसेच रोमांचक नवीन शोज आणि तुमच्‍या आवडत्‍या पात्रांचे टेलिमूव्‍हीज पाहण्‍यासाठी चॅनेल पाहत राहा.   

Leave a Reply

%d bloggers like this: