अनअकॅडमीच्या ब्रँड अम्बेसिडरपदी सचिन तेंडुलकर

पुणे – अनअकॅडमी या भारतातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यासपीठाने आज क्रिकेट क्षेत्रातील लेजंड सचिन तेंडुलकर यांच्यासह धोरणात्मक भागिदारी केल्याचे जाहीर केले आहे. अनअकॅडमीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण पुरवण्याच्या उद्देशाने ही भागिदारी करण्यात आली आहे. या भागिदारीचा एक भाग म्हणून अनअकॅडमीच्या विद्याथ्यांना स्वतः सचिन लाइव्ह आणि संवादी सत्रांच्या मालिकेद्वारे शिक्षण आणि मार्गदर्शन देणार आहेत. विशेष म्हणजे, अनअकॅडमीच्या व्यासपीठावर हे वर्ग प्रत्येकाला विनाशुल्क पाहाता येणार आहेत. अनअकॅडमीच्या ब्रँड अम्बेसिडरपदी या प्रख्यात क्रिकेट खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

अनअकॅडमी मध्ये आम्ही कायमच शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यावर आणि शिक्षणाच्या पारंपरिक प्रकारांपलीकडे जाणाऱ्या समग्र शिक्षण पद्धती तयार करण्यावर भर दिला आहे. सचिन यांचे आयुष्य आणि प्रवास प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीवर दृढनिश्चय आणि चिकाटीने मिळवलेल्या यशाचे मूल्य शिकवणारा आहे. सचिन यांनी त्यांच्या आयुष्यातील शिकवण आमच्या विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे यातून आम्हाला या भागिदारीअंतर्गत असामान्य शिक्षण अनुभवांची निर्मिती करता येईल. आम्ही सखोल आशय निर्मितीचा विकास करण्याच्या हेतूने काम करत असून येत्या काही महिन्यांत त्याचे तपशील जाहीर केले जातील, असे अनअकॅडमी समूहाचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाल म्हणाले.

खेळाच्या ताकदीवर मी कायमच गाढ विश्वास ठेवला आहे, कारण या माध्यमामुळे लोक फक्त एकत्रच येत नाहीत, तर त्यातून मिळणारे अमूल्य धडे कोणत्याही व्यक्तीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देतात. खेळातून मिळालेली शिकवण तरुण मुलामुलींसोबत शेयर करण्याचा मी कायमच प्रयत्न करत असतो. लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून अनअकॅडमीने भारताच्या कोणत्याही भागात शिक्षण उपलब्ध करत भौगोलिक सीमा सांधल्या आहेत. माझा दृष्टीकोन आणि अनअकॅडमीची शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याची मोहीम एकमेकांशी सुसंगत असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन अनोख्या शैक्षणिक अनुभवाची निर्मिती करण्याचे ठरवले,’ असे माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि बदलाचे प्रवर्तक सचिन तेंडुलकर म्हणाले.

या भागिदारीचाच एक भाग म्हणून अनअकॅडमीने सचिन यांच्यासह क्रीडा- शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त सखोल आशय निर्मिती केली जाणार असून येत्या काही महिन्यांत ते जाहीर केले जाईल.

२०१४ मध्ये  सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले होते. मास्टर ब्लास्टर  आणि गॉड ऑफ क्रिकेट ने अधिक सकारात्मक आणि दमदार भारत तयार करण्यासाठी तरुणांचा मार्गदर्शक होण्या बरोबर समाजसेवक आणि गुंतवणूकदार- उद्योजकांची भूमिका निभवली आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: