२३ एप्रिलला उलगडणार ‘राजकुमार’ची जिवलग प्रेमकहाणी

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बबन’ हा चित्रपटातील बबन आणि कोमलची प्रेमकहाणी प्रचंड गाजली होती. तसेच या चित्रपटातील गाणीही बरीच लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील बबन आणि कोमलची म्हणजेच भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधवची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूपच भावली. त्यामुळे हीच जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करत भाऊसाहेब आणि गायत्रीचा ‘राजकुमार’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

२०२० मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा सिनेमा ह्यावर्षी म्हणजे २३ एप्रिल २०२१ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अद्याप ‘राजकुमार’ सिनेमाची कथा गुलदस्त्यात असली तरी चित्रपटाच्या पोस्टरवरून सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

एस .आर . एफ .प्रोडक्शन प्रस्तुत ‘राजकुमार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केले असून, समर्थ यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करूनही समर्थ यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी मराठी चित्रपटाची निवड केली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेल्या समर्थ यांनी आवडीमुळे आणि इच्छेमुळे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

भाऊसाहेब शिंदे ,गायत्री जाधव यांच्यासोबतच ‘राजकुमार’मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे आणि अर्चना जॉईस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्चना जॉईस यांनी २०१८ ला प्रदर्शित झालेल्या के.जी.फ.( K.G.F.) चित्रपटामध्ये काम केले असून त्यांचा ‘राजकुमार’ हा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: