धक्कादायक – पोलिओ डोस ऐवजी चिमुकल्यांना पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ येथील संतापजनक प्रकार

यवतमाळ, दि. 1 – करोनाच्या काळात लांबणीवर पडलेली पोलिओ लासिकरणाची मोहीम काल रवीवारी पार पडली. परंतु या लासिकरणा दरम्यान यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ डोस ऐवजी चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे 12 चिमुकल्यांची प्रकृती खालावली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, यवतमाळ येथील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. यामध्ये 1 ते 5 वयोगटातील चिमुकल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लसीकरण अधिकाऱ्यांना जेव्हा ही चूक कळाली तेव्हा या मुलांना बोलावून पुन्हा पोलिओचा डोस पाजण्यात आला. मात्र रात्री या मुलांना अचानक उलट्याचा व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रात्री उशिरा या 12  बालकांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: