आगामी ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
नाशिक – येथे २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान होणाऱ्या आगामी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला.
अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीसाठी डॉ. नारळीकरांसोबतच मराठी कथाकार भारत ससाणे यांचे नाव देखील चर्चेत होते. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोण असावे, याचा काय नेमका फैसला होणार याकडे मराठी सारस्वतांचे लक्ष लागले होते. अखेर चर्चेला ब्रेक लागला असून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर हे अध्यक्षपद भूषवणार आहे.