‘कोव्हीशिल्ड’च्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांकडून आग लागलेल्या प्लांटची पहाणी

पुणे, दि. 22-  सीरच्या आग लागलेल्या प्लांटमध्ये ‘कोव्हीशिल्ड’ लसीचे कोणत्याही प्रकारचे काम होत नव्हते. शिवाय या लसीच्या साठवणुकीची जागाही सदर इमारतीपासून दूर आहे. त्यामुळे ‘कोव्हीशिल्ड’च्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवाय आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे. अहवाल येईपर्यंत हा घात होता ही अपघात याचा निष्कर्ष काढता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे भेट दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक नेते चेतन तुपे, सिरामचे अदर पुनावाला, सायरस पुनावालाआदी उपस्थित होते. दरम्यान, काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये दुपारी एकच्या सुमारास आग लागली होती. आग विजवण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

‘सीरम’चे एक हजार कोटींचे नुकसान – अदर पुनावाला (मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम )

“सीरमची आग लागलेली बिल्डिंग ही तीन मजली असली तरी हा प्रॉडक्शन प्लँट असल्यामुळे इथे प्रत्येक मजल्याचे दोन मजलेच बनवले गेले आहेत. बीसीजी लसीच्या उत्पादनाचे काम या इमारतीत सुरू होते. सुदैवाने ‘कोव्हीशिल्ड’च्या लसीवर या घटनेचा परिणाम झालेला नाही. परंतु, काल लागलेल्या आगीत जवळपास एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: