fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRATOP NEWS

हिंगोली – वंचित च्या फॉरेन रिटर्न महिला उमेदवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय

हिंगोली, दि. १८ – अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीने हिंगोली जिल्ह्यात दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये विजय प्राप्त करीत चमत्कार घडवून आणला. किमान सातवी पास अशी सदस्य सरपंच पदासाठी शासकीय अट असताना वंचित बहूजन आघाडीच्या फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट, महिला उमेदवार व त्यांचे पॅनल विजयी असून झाले आहे ९ पैकी ८ जागा जिंकत दणदणीत यश संपादन केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते.त्यामध्ये डॉ चित्रा अनिल कुऱ्हे पॉलिटिकल सायन्स मधून “पीएचडी” असून त्यांनी स्वीडनमध्ये डॉक्टरेट केली त्या देखील उभ्या होत्या. विशेष म्हणजे त्या आदिवासी समाजातील आहेत.डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन सह जपान आदि देशात वास्तव केले आहे. डॉ चित्रा ह्यांना पाच भाषा अवगत आहेत. असे असले तरी ह्या दाम्पत्याने आपल्या मातीतील नाळ कायम घट्ट ठेवली आहे.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित हा त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे.आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे विचाराने प्रभावित होऊन दिग्रसवाणी ही देशातील आदर्श आणि वंचित बहूजन आघाडीचा पॅटर्न ठरावी असा चंग बांधून आपल्या उच्च विध्याविभूषित पत्नीला ग्रामपंचायत साठी उभे केले होते.आज त्यांच्या नऊ पैकी आठ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.

सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्राम विकास आघाडीने डॉ चित्रा कुऱ्हे ह्यांना सरपंच पदाचा उमेदवार जाहीर करूनच प्रचार सुरू केला होता.
हे करताना त्यांनी “वंचितांचा वचनानामा” प्रकाशित करून गावच्या विकासाचा रोडमॅप ग्रामस्थान पुढे मांडला आहे.भ्रष्ट्राचार मुक्त ग्रामपंचायत, दारु मुक्त आणि डिजिटल ग्रामपंचायत, सौरऊर्जेचा वापर, मुबलक व स्वच्छ पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, महिला आरोग्य आणि रोजगार अश्या अनेक मुद्यांना घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे संकल्पना असलेल्या ग्रामविकासाची मांडणी केली आहे. प्रचारात देखील विरोधात उभे असलेल्या उमेदवार किंवा पॅनल बद्दल टिका न करता वंचित विकासाचा अजेंडा मांडला जातो.दारू, मटन, पैसा पार्टी हा प्रकार कुठेही होऊ दिला नाही.

डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे ग्राम विकासासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे मार्गदर्शनात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे हिंगोली जिल्हा मध्ये आदर्श ग्रामपंचायत घडविणार असल्याचे त्यांनी जाहीर. केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावातील विजयासाठी वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने पक्षनेते बाळासाहेब, युवा प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, निरीक्षक अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, महासचिव रविंद्र वाढे ह्यांचे आभार व्यक्त केले. आठ वर्षे जगातील विविध देशात राहिलेल्या फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट (पोलिटिकल सायन्स मध्ये पीएचडी) असलेल्या आदिवासी समूहाच्या डॉ चित्राताई अनिल कु-हे ह्या सरपंच पदासाठी असल्याने आगामी काळात देशात दिग्रसवाणीचा आदर्श घेतला जाईल , असा आत्मविश्वास डॉ चित्रा ह्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading