Wednesday, June 17, 2026
BusinessNATIONAL

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लि. ची प्रारंभी समभाग विक्री सोमवार पासून सुरू होणार

मुंबई –  इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (“कंपनी”) ही भारतीय रेल्वेची मार्केट बॉरोइंग कंपनी सोमवार, जानेवारी 18, 2021 रोजी प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीसंबंधी बिड / इश्यू कालावधी सुरू करायचे ठरवले आहे (“इक्विटी शेअर्स” आणि अशी प्रारंभी समभाग विक्री “इश्यू”). बिड / इश्यू बुधवार, जानेवारी 20, 2021 रोजी बंद होणार आहे. इश्यूसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 25 रुपये ते 26 रुपये असा आहे.

प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1,782,069,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची प्रारंभी समभाग विक्री केली जाणार आहे. प्रारंभी समभाग विक्रीमध्ये एकूण 1,188,046,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडून 594,023,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा (“सेलिंग शेअरहोल्डर”) ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (“ऑफर फॉर सेल”). इश्यूमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी (येथे व्याख्या दिल्याप्रमाणे) एकूण 5.00 दशलक्ष रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव आहेत (“एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन”). इश्यूमधून एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन वजा केल्यावरच्या शेअर्सना नेट इश्यू म्हटले आहे.

किमान 575 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल आणि त्यानंतर 575 इक्विटी शेअर्सच्या पटीमध्ये.

हा इश्यू, (“एससीआरआर”) असा बदल केल्यानुसार, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b) नुसार, तसेच बदल केल्यानुसार, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2018 मधील रेग्युलेशन 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) राबवला जाणार आहे. हा इश्यू बदल केल्यानुसार, बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्समधील 6(1) रेग्युलेशननुसार राबवला जाणार असून त्यामध्ये इश्यूपैकी जास्तीत जास्त 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) राखून ठेवले जातील. बीआरएलएमच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, कंपनी व प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स क्यूआयबी पोर्शनमधील 60% पर्यंतचा भाग अँकर इन्व्हेस्टर्ससाठी (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) विशिष्ट प्रमाणात राखून ठेवू शकते. अँकर इन्व्हेस्टर्सपैकी एक तृतियांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी त्यांच्याकडून अँकर इन्व्हेस्टरना दिलेल्या प्राइसनुसार वा त्याहून अधिक प्राइसनुसार आलेल्या वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये अंडरसबस्क्रिप्शन झाले किंवा नॉन-सबस्क्रिप्शन झाले तर उरलेले इक्विटी शेअर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. तसेच, क्यूआयबी पोर्शनच्या 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील आणि क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. ऑफरपैकी किमान 75% शेअर्स क्यूआयबींना नाही दिले तर कंपनीला मिळालेली बिडची रक्कम परत दिली जाईल. परंतु, म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनसाठी राखून ठेवलेल्यांपैकी उर्वरित इक्विटी शेअर हे क्यूआयबींना योग्य प्रमाणात देण्यासाठी नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील.

तसेच, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स  नुसार, ऑफर प्राइसइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोलीनुसार, ऑफरपैकी कमीत कमी 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला जाईल आणि कमीत कमी 35% भाग रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवला जाईल. तसेच, [●] इक्विटी शेअर्स हे एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शनअंतर्गत बिडिंग करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रमाणात राखून ठेवले जातील. सर्व बिडरना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. लागू असल्यास, आरआयबीसाठी यूपीआय आयडी द्यावा. ही रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकांद्वारे (“एससीएसबी”) या खात्यात बोलीची रक्कम ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होता येणार नाही.

फ्रेश इश्यूतून मिळालेल्या रकमेचा पुढील प्रकारे केला जाणार आहे: (i) व्यवसायाच्या वृद्धीमुळे निर्माण झालेली भविष्यातील भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी इक्विटी कॅपिटल वाढवण्यासाठी; आणि (ii) एकंदर कॉर्पोरेट उद्देशासाठी.

या ऑफरमार्फत दिल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची नोंदणी लिस्टिंगनंतर बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”, बीएसईसह “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे केली जाणार आहे.

ऑफरसाठी डीएएम कॅपिटल अॅडव्हॉयजर्स लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading