fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNE

हिंदू धर्माचार्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा

पुणे, दि. ६- नांदेड येथे वीरशैव लिंगायत धर्माचार्य श.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांना बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी भर समारंभात ‘तुम्ही लिंगायत समाजाला हिंदू असल्याचे का सांगता’, म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या शिष्यांना मारहाण देखील केली. त्यामुळे प्रशासनाने दोषी व्यक्तींना ताबडतोब अटक करुन कायदेशीर कारवाई करावी , अशी मागणी विश्वहिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.


यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण ,श्रीकांत चिल्लाळ , जितेंद्र अनासपुरे, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे महानगर संयोजक अतुल सरडे, मल्लिकार्जुन सरडे, डॉ.मुगावे, रवी पाटील, गुरुनाथ   हरदरे, पुंडलिक मेथे उपस्थित होते. किशोर चव्हाण म्हणाले, सदर प्रकार केवळ वीरशैवांच्या नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्रातील हिंदू संताच्या झालेल्या हत्या आणि वाढते हल्ले पहाता अत्यंत गंभीर आहे. अविनाश भोसीकर हा गुंड मानसिकतेचा असून, यापूर्वी देखील त्याने अशी कृत्ये करुन हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
यापूर्वी नांदेडमध्येच वीरशैव लिंगायत समाजाचेच सद्गुरु निर्वाण पशुपती शिवाचार्य नागठाणकर महाराज यांची हत्या झाली, पालघरमधील हिंदू साधूंचे झालेले हत्याकांडही अजून ताजेच आहे. अशा परिस्थितीत निव्वळ हिंदूद्वेषापोटीच जर काही लोक हिंदू साधू आणि धर्माचार्यांना धमकी देऊन हल्ले करित असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. संबंधित व्यक्तींवर त्वरित कारवाई न झाल्यास विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading