Saturday, May 30, 2026
MAHARASHTRANATIONALTOP NEWS

कोरोनावरची लस आली, संक्राती आधी होणार लसीकरणाला सुरूवात

नवी दिल्ली, दि,५-  कोरोनावरच्या लसीच्या लसीकरणाला संक्राती आधी सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या दहा दिवसांत कधीही लासिकरणाला सुरूवात होईल, असे त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच लसीकरणाची मोहीम चालवण्यासाठी चार मोठी केंद्र उभारण्यात आली असून हवाई मार्गानं लसीची वाहतूक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ३० कोटी नांगरीकांना सुरू लस दिली जाणार आहे. यामध्ये यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. 3 कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. दरम्यान, भारतात दोन कोरोना लसी नणा च्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ या दोन लसीचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading