अशोक गोडसे यांना श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ््याअंतर्गत देण्यात येणारा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्राम देव, अॅड. राजेंद्र उमाप, आनंद तांबे, विनोद पवार यांसह दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संजीवन समाधी सोहळ््याचे यंदा ४५९ वे वर्ष आहे.
श्रीमन महासाधू संजीवन समाधी सोहळ््याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४ दिवसांचा उत्सव साधेपणाने करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दरवर्षी होणाºया गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
