Saturday, May 30, 2026
PUNE

‘लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात’ नवचंडी यागाद्वारे आरोग्यसंपन्न व सुख-समृद्ध नव्या वर्षाकरीता प्रार्थना

पुणे : आरोग्यसंपन्न व सुख-समृद्ध असे नवे वर्ष होवो, अशी प्रार्थना नवचंडी यागाद्वारे लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरामध्ये करण्यात आली. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २०२० वर्षात आलेली संकटे नव्या वर्षात न येवो आणि भारतीयांना उत्तम आरोग्य लाभो, असे साकडे दत्तमहाराजांना घालण्यात आले. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दत्तमंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवचंडी यागाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. केदार पाठक आणि नितीन बुडूख यांच्या हस्ते नवचंडी याग झाला. तर, अमोल मुळ्ये गुरुजी व सहका-यांनी पौरोहित्य केले. 

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोविड च्या पार्श्वभूमीवर यंदाचा दत्तजयंती उत्सव देखील अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. संपूर्ण वर्षभर कोरोनाचे सावट असल्याने समाजातील अनेक घटकांचे हाल झाले. त्यामुळे आता नव्या वर्षात पुन्हा एकदा नव्या उमेदिने उभे राहण्याची शक्ती मिळावी, जनजीवन सुरळीत व्हावे आणि प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading