Friday, September 4, 2026
Business

‘निओस्टेन्सिल’ अनअकॅडमी समुहात सामील

पुणे –  भारतातील सर्वात मोठा शैक्षणिक प्लॅटफॉर्म असलेल्या ‘ अनअकॅडमी  ’ने आज  ‘नियोस्टेन्सिल’ या चाचणी परीक्षांसाठी तयारी करवून घेणाऱ्या (टेस्ट प्रीपरेशन) प्लॅटफॉर्मचे अधिग्रहण करीत असल्याची घोषणा केली. यामुळे मध्यम व लहान शहरांमधील ‘टेस्ट प्रीपरेशन’ क्षेत्रात ‘ अनअकॅडमी  ’चे स्थान अधिक बळकट होणार आहे. ४७ हजारांहून अधिक नोंदणीकृत शिक्षक आणि ४ कोटींहून अधिक विद्यार्थी असलेला, अनअकॅडमी  हा भारतातील सर्वात मोठा शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. देशातील ५ हजार शहरांमध्ये १४ भाषांमध्ये शिक्षण देणारी  अनअकॅडमी  भारतात शिकण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणीत आहे.

संपूर्ण भारतात दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, ते सर्वांना घेता येण्याजोगे व परवडणारे असावे, या उद्देशाने ‘नियोस्टेन्सिल’ची स्थापना २०१४ मध्ये केली. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून विद्यार्थी व शिक्षक यांच्या प्रवेशयोग्यतेच्या समस्येचे निराकरण करता येते. या ‘लाइव्ह-लर्निंग प्लॅटफॉर्म’मुळे १00 हून अधिक कोचिंग संस्थांना ‘लाइव्ह’ होण्यात मदत झाली आहे आणि १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या घरात आरामात बसून शिक्षण घेता येऊ लागले आहे. ‘कोविड’च्या साथीमुळे सर्वत्र टाळेबंदी असताना या ‘एडटेक स्टार्टअप’ने शैक्षणिक संस्थांशी भगीदारी करण्याचे प्रमाण दुपटीने वाढविले. चाचणी परीक्षांच्या तयारीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट कंपन्या आणि कार्यसंघ यांच्या रुपात आम्ही नेहमीच भागीदार शोधत असतो. ‘ अनअकॅडमी ‘ मध्ये ‘निओस्टेन्सिल’चा समावेश करणे आमच्या हिताचेच ठरणार आहे,” असे‘ अनअकॅडमी  ’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाळ यांनी म्हटले.

 “शिक्षण घेऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती, भले ती महानगरांमध्ये राहात असो किंवा नसो, तिला उत्तम ठिकाणी शिकण्याची संधी मिळायला हवी, असा आमचा संकल्प आहे.  अनअकॅडमी   समुहामध्ये सामील झाल्याने एका मोठ्या चळवळीचा भाग बनून आम्हाला हा संकल्प तडीस नेता येणार आहे. ” असे ‘निओस्टेन्सिल’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुश बीजल म्हणाले.

या अधिग्रहणानंतरही, कुश बीजल ‘निओस्टेन्सिल’चे कामकाज सुरू ठेवणार आहेत आणि दोन्ही प्लॅटफॉर्म एकत्र कसे काम करू शकतील, याचा समन्वय शोधणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading