Saturday, June 13, 2026
MAHARASHTRA

ईडीची नोटीस स्वस्त झाली – प्रफुल्ल पटेल

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीची नोटीस बजावण्यात येत आहे. त्यातच, काल संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं असून आजकाल कुणालाही नोटीस बजावले जाते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. हे आता स्वस्त झालंय. ईडीची नोटीस येणं याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. ईडीच्या नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading