Saturday, June 13, 2026
PUNETOP NEWS

भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

पुणे – पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश लडकत (वय ५३) यांचे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती अयशस्वी झाल्याने त्यांचे निधन झाले.

११ ऑक्टोबर १९६७ रोजी लडकत यांचा जन्म झाला. नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading