टाटा स्काय वर अॅस्ट्रो दुनिया हि नवीन सेवा सुरु
पुणे – टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट वितरण आणि पे टीव्ही व्यासपीठाने आपल्या व्यासपीठावरील विविध प्रकारच्या परस्परसंवादी (इंटरअॅक्टिव्ह) सेवांमध्ये टाटा स्काय अॅस्ट्रो दुनिया ही नवी सेवा देऊ केली आहे. डॉमनिक प्रोडक्शन्स प्रा. लि.सोबत सहकार्य करत टाटा स्काय अॅस्ट्रो दुनियावर सेलिब्रिटी ज्योतिषशास्त्रज्ञांनी खास तयार केलेला कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तू आणि अशा अनेक शास्त्रांच्या जगाचा आढावा घेण्यासाठी ही सेवा एक पर्याय ठरते.
सबस्क्राईबर्ससाठी टाटा स्काय अॅस्ट्रो दुनियावर विनाखंड आणि जाहिरातमुक्त स्वरुपात ज्योतिषशास्त्राशी संबंधित कंटेंट उपलब्ध असेल. अंकशास्त्र ते पत्रिका, टॅरो रीडिंग ते रेकी, वास्तू ते फेंगशुई, वेदिक अॅस्ट्रॉलॉजी ते हस्तरेषा आणि फेस रीडिंग अशा अनेकविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध असतील. या सेवेत मुनिषा खटवानी, डॉ. संदीप कोचर, बिंदु खुराना, राशेष शाह, डॉ. जाई मदन, डॉ. ज्योती जांगियानी, ग्रीनस्टोन लोबो, डिंपल लुनिया आणि इतर अनेक सेलिब्रिटी तज्ज्ञही आहेत. त्याचप्रमाणे, सबस्क्राईबर्सना भविष्यासंबंधी वैयक्तिक स्वरुपावर जाणून घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवार कोणत्याही वेळी आपले प्रश्न तज्ज्ञांना ईमेल करता येतील. ख्यातनाम सेलिब्रिटी ज्योतिष नरेंद्र बुंदे साधारण पाच ते दहा प्रश्नांची उत्तरे देतील. या जाहिरातीचा चेहरा अतुलनीय प्रतिभेचे अभिनेते विनय पाठक असतील
सबस्क्राईबर्सना टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कुंडली बनवणे, दैनंदिन भविष्य आणि आस्क अ जीनी यासारख्या सुविधांचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे, या सेवेच्या सर्व सबस्क्राईबर्सना त्यांच्या रीमोटवर लाल बटण दाबून दैनंदिन भविष्यवाणी आणि फॉर्च्युन कुकी उपलब्ध होतील.ही सेवा आता सर्व सबस्क्राईबर्ससाठी पहिले दहा दिवस कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आणि त्यानंतर दररोज अवघ्या २ रुपयांत ५१२ या चॅनेल क्रमांकावर उपलब्ध आहे. या व्यासपीठावरील लोकप्रिय ज्योतिषांशी कॉल किंवा चॅटच्या माध्यामातून अगदी सहज संपर्क साधता येईल. या आणि अशा अनेक सुविधांमुळे टाटा स्काय अॅस्ट्रो दुनिया हे ज्योतिषशास्त्राच्या जगात डोकावून पाहण्याचा एक उत्तम मार्ग ठरतो.
या सादरीकरणाबद्दल चीफ कमर्शियल अॅण्ड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, टाटा स्कायवर आमच्याकडे व्यासपीठावरील सेवांमध्ये प्रचंड वैविध्य आहे आणि या सेवा सातत्याने बळकट करण्यावर आमचा विश्वास आहे. टाटा स्काय अॅस्ट्रो दुनियाच्या माध्यमातून आमच्या सबस्क्राईबर्सना ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तूशास्त्राचा वापर करून विश्वासार्ह ज्योतिषतज्ज्ञांकडून आयुष्य आणि घराबद्दल तसेच वैयक्तिक सल्ले घेता येतील.
डॉमनिक प्रोडक्शनचे संचालक उत्पल वैष्णव म्हणाले, भारतात ज्योतिषशास्त्राचं मूळ आहे. त्यामुळे एक अग्रणी उपक्रम म्हणून आमच्यासाठी ही फार मोठी संधी आहे. गुंतवून ठेवणाऱ्या कार्यक्रमाच्या स्वरुपात ग्राहकांना विश्वासार्ह ज्योतिषशास्त्र सेवा देण्यासाठी टाटा स्कायसोबत सहकार्य करणं हा आमचा सन्मान आहे.
