Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

पुष्कर श्रोत्री घेऊन येणार ‘सून सासू सून’

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे. नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणारी स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात असाच एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त आणि फक्त सुसंवाद. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री. स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम पुष्कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे.

नव्या वर्षातल्या या नव्या पर्वणीबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणाऱ्या या दोघी कधी मैत्रीणी तर कधी मायलेकी असतात.  कधी कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल असा का कार्यक्रम आहे.’

तेव्हा पाहायला विसरु नका नव्या वर्षातला नवा कार्यक्रम सून सासू सून ११ जानेवारीपासून सायंकाळी ५.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading