Saturday, June 20, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात शुक्रवारी डिस्चार्ज रुग्णांपेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त

पुण्यात 311नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर आज १ हजार ४२७ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात रिकव्हरी रेट ९४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातला मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख १ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १३ हजार ३८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७७ हजार ५८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज नोंद झालेल्या ७१ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर पाच मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात 311 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 493 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 5 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    177358
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-4481
  • एकूण मृत्यू – 4597
  • एकूण डिस्चार्ज- 168280

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading