कडाक्याच्या थंडीत भाजपने गरिबांना दिली मायेची ऊब
पुणे – भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गरजू व्यक्तींना मोफत ब्लॅंकेट शुक्रवार (२५ डिसेंबर) रोजी वाटप करण्यात आले. एकबोटे रुग्णालय शिवाजीनगर या ठिकाणी नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, भाजपा युवती आघाडी अध्यक्ष प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुणे शहरात शिवाजीनगर,कामगार पुतळा, रेल्वे स्टेशन, तोफखाना, पुणे विद्यापीठ, डेक्कन,स्वारगेट या परिसरात उघड्यावर राहणाऱ्या गरजू पाचशे नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा नेहमीच सामान्य जनता राहिली आहे . पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी गरिबांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यांच्या कार्याची प्रेरणा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच त्या अटलजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज पुणे शहरामध्ये हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असल्याचे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष, प्रा.डॉ.गजानन एकबोटे, माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश कोंढाळकर, समीर ताकवणे, निलेश काची, डॉ.वैष्णवी एकबोटे, डॉ.वैजयंती जाधव, सिध्दी वाघोलीकर, संदिप शिरोळे, पृथ्वी पाटील, पिंटू निवंगुणे, अविनाश चव्हाण, आशिष बने, यांनी परिश्रम घेतले.
