युरोपीय बाजारपेठेत रयालट्रीस नेजल स्प्रे बाबत ग्लेनमार्क आणि मेनारिनी यांच्यात करार
पुणे — बालकन प्रदेशासह युरोपातील ३३ देशांमध्ये रयालट्रीस या नावीन्यपूर्ण नेजल स्प्रेच्या व्यावसायिक सादरीकरणासाठी मेनारिनी ग्रुप बरोबर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संधोधन-प्रेरित जागतिक एकात्मिक फार्मास्युटिलकल कंपनीच्या स्पेशॅल्टी एसए या स्वीस सबसिडायरी कंपनीने एक्सक्ल्युझिव्ह लायसन्सिंग अॅग्रीमेंट केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
ग्लेनमार्कने विकसित केलेल्या रयालट्रीस (ओलोपॅटडाईन हायड्रोक्लोराईड आणि मोमेटासोन) हे एक नावीन्यपूर्ण उत्पादन आहे. बारा वर्षापुढील व्यक्तींना सिझनल अॅलर्जिक ह्रिनिटीस (एसएआर) या आजाराच्या लक्षणांवर उपाय म्हणून या अँटी-हिस्टमाईन व स्टेराॅईडच्या फिक्स्ड-डोस काॅम्बिनेशनचा नेजल स्प्रे प्रभावी ठरतो.
करारानुसार, युरोपीयन रेग्युलेटरी आॅथिरिटीकडून सर्व कायदेशीर परवानग्या घेण्याची जबाबदारी ग्लेनमार्ककडे असणार आहे. तर या बाजारपेठेतील आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर विज्ञानाधारित-माहिती आणि व्यावसायिक सादरीकरणाची जबाबदारी मेनारिनी ग्रुपकडे असणार आहे. रयालट्रीसच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नासह संपूर्ण करारासाठीचे पैसे ग्लेनमार्कला मिळणार आहेत
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिका व लाटम प्रदेशाचे (ईएमईए-एल) बिझनेस हेड अचिन गुप्ता म्हणाले, युरोप प्रदेशात रयालट्रीससाठी मेनारिनी बरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होतो आहे. या प्रदेशामध्ये श्वसनाशी संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक सादरीकरणाचा आणि भागीदारीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. युरोपमध्ये रेस्पिरेटरी उत्पादनांबाबत ग्लेनमार्कचे लक्ष आहे हे बिंबवण्यासाठी ही भागीदारी एक महत्त्वाचे व पुढचे पाऊल आहे. काही बाजारपेठांमध्ये रयालट्रीसचे व्यावसायिक सादरीकरण हे ग्लेनमार्क स्वतः करणार आहे, तर युरोप प्रदेशासाठी या भागीदारीमुळे चांगला प्रतिसाद मिळेल. जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये सादरीकरण झालेला ग्लेनमार्कचा पहिला ग्लोबल ब्रँड म्हणून रयालट्रीसला पुढे आणण्याचे आमचे उद्दिष्टही सफल होत आहे.”
मेनारिनी ग्रुपचे महाव्यवस्थापक पिओ मे म्हणाले, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सबरोबर ही एक्सक्ल्युझिव्ह लायसन्सिंग अॅग्रीमेंट केल्याबद्दल आम्हाला आनंद होतो आहे. अॅलर्जी आणि रेस्पिटेरी उत्पादनांच्या शृंखलेमध्ये रयालट्रीसची भर पडणे ही चांगली घडामोड आहे. हे नावीन्यपूर्ण उत्पादन रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी आमच्या अनुभवाचा रास्त उपयोग होणार आहे. रयालट्रीसच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची आम्ही वाट पाहात आहोत. हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात दाखल करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत.
ग्लेनमार्कने विकसित केलेले रयालट्रीस (ओलोपॅटडाईन हायड्रोक्लोराईड आणि मोमेटासोन फ्यरोअेट) नेजल स्प्रे हे उत्पादन हिकमा फार्मास्युटिकल्स पीएलसी या कंपनीच्या भागीदारीतून अमेरिकन बाजारपेठेत व्यावसायिक स्वरुपात दाखल करण्यात येत आहे. आॅस्ट्रेलियामध्ये सिकिरस प्रा. लि या ग्लेनमार्कच्या भागीदाराच्या मदतीने यंदाच्या वर्षीच्या सुरवातील हे उत्पादन तेथील बाजारात सादर करण्यात आले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दक्षिण आफ्रिकामध्येही रयालट्रीस उत्पादन नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये युक्रेन आणि उझबेकिस्तानमध्ये या उत्पादनाचे व्यावसायिक सादरीकरण होणार आहे. दक्षिण कोरियामध्ये मार्च २०२१ पर्यंत रयालट्रीस सादर करण्यासाठी ग्लेनमार्क व युहान काॅर्पोरेशन एकत्र आले आहे.
रयालट्रीस उत्पादनासाठी ग्लेनमार्कला आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, कंबोडिया, युक्रेन, उझबेकिस्तान, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये परवानगी व मान्यता मिळाली आहे. तसेच या उत्पादनाच्या परवानगी आणि मान्यतेसाठी कंपनीने यापूर्वीच युरोपियन युनियन, कॅनडा, रशिया, ब्राझिल, मलेशिया, सौदी अरेबिया व अन्य देशांमध्ये अर्ज केलेला आहे. ग्लेनमार्कचा चीनमधील भागीदार ग्रँड फार्मास्युटिकल (चायना) कंपनीने लिमिटेड यंदाच्या आर्थिक वर्षात आयएनडीसाठी अर्ज करणार आहे.
