Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

‘सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचे सोनी मराठी चॅनलचे षढयंत्र – संभाजी ब्रिगेडचा आरोप

महाराष्ट्रात TRP घोटाळा करून महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सावित्री-ज्योती’ मालिका २६ डिसेंबर ला बंद पाडली जात आहे हे षढयंत्र आहे. आपण पाहात नसल्यामुळे आणि मालिकेला TRP मिळत नसल्यामुळे बंद होत आहे असे नाही. महाराष्ट्रातसह इतर मराठी बहूल राज्यात सुध्दा मालिका मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि अभिनेत्री अश्विनी कासार यांनी साकारलेली सावित्रीबाईं फुलेंची कौतुकास्पद व अभिनंदननीय आहे. मालिकेचे लेखन सुध्दा दर्जेदार आहे. म्हणून संपूर्ण मालिका दाखवली गेली पाहिजे. अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.

सोनी चॕनल मधील काही मंडळी ‘सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याच्या मार्गावर आहेत. परंतु महाराष्ट्राला ‘सावित्री-ज्योतीरावाच्या विचारांची’ गरज आहे. सोनी मराठी चॕनल २६ डिसेंबर रोजी मालिका बंद करणार आहे. सोनी मराठी चैनल मालिका बंद करण्याचा खोडसाळपणा करत आहे. जर मालिका बंद झाली तर… सोनी मराठी चॕनलवर’चे इतर कोणतेही कार्यक्रमाचे प्रक्षेपण संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही. सगळे कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा देण्यात आला आहे.

लोकांचे प्रबोधन करणारी, सत्यशोधक चळवळ आणि चांगली विचारधारा मजबूत करणारी चांगली मालिकेला आपण प्रतिसाद देत नसल्यामुळे बंद पडत आहे सेक्सी पाळली जात आहे, हे दुर्दैवी आहे. आमच्या लोकांना काय पाहायला आवडतं…? हेच कळायला मार्ग नाही. तुम्ही प्रसिद्धी आणि प्रतिसाद नाही दिला तर चांगल्या कलाकृती निर्माण होणार तरी कशा…!

‘सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचा… हा निर्णय मनाला वेदना देणारा आणि विचारांना तिलांजली देणारा आहे. TRP च्या नादात आम्ही आपलं अस्तित्व विसरत चाललोय.

महाराष्ट्रात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची सोनी मराठी टीव्हीवरील मालिका 26 डिसेंबर नंतर सुद्धा सुरू राहिली पाहिजे. बंद करू नये यासाठी ‘महाराष्ट्र सरकार’ने (ठाकरे सरकारने) पुढाकार घ्यावा. सोनी मराठी चॕनल ला कळवावे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी या विषयावर विशेष लक्ष घालून मालिका चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा… सोनी टीव्हीचे कुठले कार्यक्रम संभाजी ब्रिगेड प्रसिद्ध होऊ देणार नाही. संभाजी ब्रिगेड कार्यालयात घुसून आंदोलन करेल.

वाद मालिकेचा लागत नसून विचारांचा जिवंत ठेवण्यासाठी आहे. आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत. सोनी TV वर ‘संभाजी ब्रिगेड’ धडकणार असे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading