Saturday, May 30, 2026
PUNETOP NEWS

पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार

स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार , इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार  तसेच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार

पुणे: पुणे स्मार्ट सिटीला ६ प्रतिष्ठेचे स्कॉच पुरस्कार मिळाले आहेत. स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. यापूर्वी झालेल्या सेमी फायनल स्पर्धेत या ३ प्रकल्पांना ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला आहे. नुकतीच ६९ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला. ऑनलाईन मीटिंगद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने दि. २२/१२/२०२० रोजी हे ६ पुरस्कार स्वीकारले.

कठोर निकष व मूल्यांकनातून पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांनी  मिळवला लौकिक. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारांवर यंदा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) मोहोर उमटवली असून, पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार मिळाला आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांनी १००+ हून अधिक सेमी फायनल प्रकल्पांमध्ये स्पर्धा करून, प्लॅटिनम व रौप्य पुरस्कार मिळवला आहे.

पुणे स्मार्ट सिटीला २०१८ मध्ये स्मार्ट सिटीसाठीचा स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला होता तसेच २०१९ मध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट क्लिनिक या प्रकल्पाला देखील स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार मिळाला होता.

निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांनुसार पीएससीडीसीएलच्या कामाचे प्रमाणीकरण आणि परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे स्कॉच पुरस्कारासाठी पीएससीडीसीएलची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारांपेक्षा स्कॉच पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो, आणि पुरस्कारार्थी प्रकल्प हा वस्तुतः देशात सर्वोत्कृष्ट असल्याचे या पुरस्कारामुळे प्रमाणित होते.

 ‘स्टेट ऑफ गव्हर्नन्स’ या सदराखाली नुकतीच ६९ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यामध्ये स्कॉच ग्रूपच्या वतीने या निवडीची घोषणा करून पीएससीडीएसलच्या स्मार्ट ई-बसला प्लाटीनम पुरस्कार तर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सेफ्टीपीन  या प्रकल्पांना सिल्व्हर पुरस्कार घोषित करून सन्मान देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading