Saturday, May 30, 2026
NATIONALTOP NEWS

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी निधन झाले. दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. मोतीलाल व्होरा यांनी रविवारी त्याचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र आज त्यांची प्राण ज्योत मालवली.

मोतीलाल व्होरा मध्य प्रदेशमधील एका हिंदी वृत्तपत्राचे पत्रकार होते. त्यानंतर ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तसेच त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. काँग्रेसमध्ये नरसिम्हा राव, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते खास होते.

वोरा यांचा जन्म २० डिसेंबर, १९२७ ला राजस्थानमधील नागौर येथील पुष्करणा ब्राह्मण कुटुंबात झाला होता. रायपूर आणि कोलकातामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम केले. शांतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना चार मुलं व दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा अरुण वोरा छत्तीसगडमधील दुर्ग विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading