Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

अदिती जलतारे साकारणार अहिल्याबाईची मुख्य भूमिका

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच घेऊन येत आहे एक ऐतिहासिक मालिका – पुण्यश्लोक अहिल्याबाई. ‘अहिल्याबाई होळकर’ यांच्या अद्वीतीय जीवनावर आधारित ही मालिका 18व्या शतकातील इतिहास सांगते. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या पाठिंब्याने समाजात प्रचलित पितृसत्ताक रुढींचा हिरीरीने विरोध केला आणि लोकांच्या व विशेषतः महिलांच्या कल्याणासाठी समारात्मक योगदान दिले. अहिल्याबाईंच्या सार्थक जीवनाची ही शौर्यगाथा  आहे, जी तिच्या सासर्‍यांच्या म्हणजे मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य होऊ शकली नसती. माणूस जन्माने नाही, तर आपल्या कर्माने मोठा होतो याचे उदाहरण अहिल्याबाईंनी आपल्या जीवनातून घालून दिले.

मध्यवर्ती व्यक्तिरेखा अहिल्याबाई होळकरांच्या बालपणीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध बालकलाकार अदिती जलतारे हिला घेण्यात आले आहे. अदितीने इतक्या कमी अवधीत केलेले काम आणि मिळवलेले प्रेक्षकांचे प्रेम ध्यानात घेऊन ही मालिकेतील ही अत्यंत महत्त्वाची भूमिका तिला देण्यात आली आहे.

या मालिकेचा एक भाग होत असल्याचा आनंद व्यक्त करताना अदिती म्हणते, “सोनी टीव्हीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेचा एक भाग होताना मला खूप अभिमान वाटत आहे. ही मालिका खूप मोठ्या फलकावर तयार करण्यात येत आहे. एक अत्यंत महान व्यक्तिमत्व साकारण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली आहे. खरोखर, स्वप्न पूर्ण होण्याचा हा क्षण आहे. आशा आहे की, अहिल्याबाईंच्या भव्य वारशाला आम्ही न्याय देऊ शकू आणि त्यांच्या दिव्य जीवनाचा पट उलगडून दाखवू शकू. या मालिकेबाबत मी खूप उत्साहात आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading