Sunday, May 31, 2026
Sports

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पुण्यात आगमन

पुणे : भारतीय क्रिकेटला वेगळ््या उंचीवर नेऊन ठेवणाºया महेंद्रसिंग धोनीच्या महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे पुण्यात आगमन होत आहे. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमीसोबत संलग्न झाली आहे. क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमी आणि महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमी एकत्रितपणे पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले असून या अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन जानेवारी २०२१  च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरिल कलीनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी रणजी खेळाडू  बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकेडमीचे गजेंद्र पवार आणि अनिल वाल्हेकर, उमेश पाथरकर, अमोल माने उपस्थित होते. 
डेरील कलीनन म्हणाले, सध्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटयुगात पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना जास्तीतजास्त आधुनिक पद्धतीचा सराव मिळावा आणि सोबतच क्रिकेटमधल्या नवनवीन पद्धतीचे सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमी आणि एम.एस.धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
गजेंद्र पवार म्हणाले,  क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमीची स्थापना २०१३ मध्ये क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा मुख्य दृष्टीकोन समोर ठेऊन झाली. ५ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रिकेटचे प्रशिक्षण येथे मिळते. एम. एस. धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीशी संलग्न झाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे.

स्थानिक युवा गुणवान खेळाडूंना अत्युत्तम क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे, तांत्रिक आणि आधुनिक व्यायामाचे महत्व जाणून क्रिकेटमधला बदल स्थानिक खेळाडूंना अंगिकारता यावा म्हणून  महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीसोबत एकत्र येण्याच्या दृष्टीने क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमीने एक अत्यंत महत्वाचे पाउल उचलले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading