Sunday, May 31, 2026
ENTERTAINMENTPUNE

गोवा लघुपट महोत्सवात पेनफुल प्राईड सर्वोत्कृष्ट

पुणे, दि. १४ – यंदा पुण्यामध्ये झालेल्या ७ व्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातील लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्वाची पारितोषिके जिंकून चमक दाखविली. पेनफूल प्राईल सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर महेश लिमये यांना ‘पुनरागमनाय च’ साठी आणि स्वप्निल कापुरे यांना ‘दोन जगातला कवी’ या लघुपटांसाठी  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.

मराठी चित्रपट परिवारतर्पेâ आयोजित महोत्सवाचे ज्येष्ठ लेखक श्रीनिवास भणगे, सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे, ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड, भालचंद्र सुपेकर यावेळी उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक ‘वाट्या’ लघुपटाला मिळाले जर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पारिताषिक सुशांत पांडे यांना मिळाले.

पुनीत बालन स्टुडियोज ची निर्मिरती असलेल्या ‘आशेची रोषणाई’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. ‘लव्ह पॉईट’ लघुपटाला  सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट प्रयोगशील लघुपटाचे पारिताकषिक ‘कलावा’ लघुपटाने पटकाविले. चेन्नईतील ‘मधुरम’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा, संकलन आणि पटकथेची पारितोषिके जिंकली. बंगलोर मधील ‘एक कप चहा’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपटाचे पारितोषिक पटकाविले. तर मुदस्सर खान यांच्या लघुपटाने सर्वोत्कृष्ट सांगितिक लघुपटाचा मान पटकाविला. शुभम खैरनार यांची मंत्रा लघुपटाने सर्वोत्कृष्ट जाहीरातीचे पारितोषिक पटकाविले. मोगरा लघुपटाला फिक्शन लघुपटाचे पारिताषिक मिळाले तर ‘ठिणगी’ लघुपटाला लाईव्ह एक्शन लघुपटाचे बक्षिस मिळाले.
ज्योती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. भालचंद्र सुपेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading