Interview – ‘हिरो – गायब मोड ऑन’मधील माझ्या भूमिकेच्या माध्यमातून माझ्या बालपणीच्या काल्पनिक गोष्टी ख-या ठरत आहेत” – अभिनेत्री येशा रुघानी
१. मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन‘ला होकार देण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले? सोनी सबशी संलग्न असल्यामुळे कसे वाटत आहे?
सुपरहिरो, साय-फाय मालिका ते फिल्म स्टार असलेली झाराच्या या विशिष्ट भूमिकेपर्यंत माझ्यासाठी ही मालिका अत्यंत रोमांचकारी होती. मी दुसरा विचार न करता मालिकेमध्ये काम करण्याला होकार दिला. माझ्या बालपणापासूनच मला सुपरहिरोंबाबत आणि फिल्म सेटच्या मागे घडणा-या गोष्टी जाणून घेण्याबाबत आवड राहिली आहे. मला आनंद होत आहे की मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’च्या माध्यमातून माझ्या बालपणीच्या काल्पनिक गोष्टी ख-या ठरत आहेत.
लोकांना आनंद व आशेची नित्यांत गरज असण्याच्या काळामध्ये सोनी सब परिवाराचा भाग असणे आणि भारतीय प्रेक्षकांसाठी परिपूर्ण मनोरंजन सादर करणे अत्यंत आनंददायी आहे.
२. या मालिकेला खास बनवणारी बाब कोणती? ‘हिरो – गायब मोड ऑन‘ला इतर काल्पनिक मालिकांपेक्षा वरचढ ठरवणारी गोष्ट कोणती?
मालिकेचे प्रोमो सादर करण्यात आले तेव्हा प्रोमोच अगदी खात्रीदायी होते आणि त्यामधून मालिकेच्या भव्यतेची एक झलक पाहायला मिळाली. माझा दृढ विश्वास आहे की मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’ आणि तिचे लुक व भाव यांची निश्चितच चर्चा होईल, ज्यामुळे ही मालिका का वेगळी आहे, हे दिसून येईल. अत्याधुनिक व्हिज्युअल्स, एलियन्सचे अविश्वसनीय मेक-अप आणि लक्षवेधक व संबंधित पटकथा यामधून दिसून येते की मालिका प्रेक्षकांसाठी भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी न दिसण्यात आलेल्या गोष्टी घेऊन येत आहे.
३. मालिकेच्या सेटला पाहिल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
मी अचंबित झाले. सेट अत्यंत सुंदर आहे. व्यक्तिश:, माझे सेटशी भावनिक नाते जुळले आहे, कारण येथेच मी माझी पहिली मालिका देखील केली होती.
सेटवर प्रत्येक गोष्ट सुरेखरित्या करण्यात आली आहे. स्पेसशिप सेट अपपासून एलियन विश्वनिर्मितीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. पाहणा-यांना वाटेल की ते हॉलिवुड चित्रपटाच्या सेटवर आहेत. घरे व रस्त्यांचे संपूर्ण लुक देखील अद्वितीयरित्या तयार करण्यात आले आहे. मला कुलाबा स्ट्रिट्सला जायला आवडते आणि मला या स्ट्रिट्सना सुरेखरित्या तयार केलेले पाहिल्यानंतर खूप आनंद झाला.
४. कृपया आम्हाला तुझी भूमिका झाराबाबत सांग, तू या भूमिकेशी संलग्न होतेस का?
झारा अत्यंत मेहनती व समर्पित मुलगी आहे. तिला काम करायला आवडते आणि ती कामासाठी तिच्या कुटुंबापासून दूर मुंबईमध्ये राहते. हीच पहिली गोष्ट आहे, जी मला झाराशी संलग्न करते, कारण मला देखील अथक मेहनत करायला आवडते.
झाराच्या भूमिकेमध्ये दोन छटा सामावलेल्या आहेत – एक सर्वांना दिसू शकते आणि दुसरी फक्त निवडक लोकांनाच दिसण्यात येते. ती अशी मुलगी आहे, जी सहजपणे आटोक्यात येऊ शकत नाही आणि काहीशी गर्विष्ठ आहे. पण तुम्ही तिला ओळखलात की तुम्हाला वाटते ती अत्यंत सुरेख, सकारात्मक व विनम्र व्यक्ती आहे. झाराचा हा स्वभाव तिला मनमोकळेपणाने बोलावेसे वाटलेली व्यक्ती भेटल्यानंतर दिसून येईल.
५. झारा ही मालिकेमधील महत्त्वाकांक्षी अभिनेत्री आहे. तुझा अभिनेत्री बनण्याचा प्रवास कसा राहिला आहे?
प्रामाणिकपणे सांगायचे तर, माझ्यासाइी या क्षेत्रामध्ये येण्याचा अनुभव अद्वितीय राहिला आहे. मी नेहमीच्या निवड प्रक्रियेचा सामना केला नाही. मी एका प्रदर्शनामध्ये गेले होते. तेथे मला पाहण्यात आले आणि त्यांनी मला विचारले की मला मालिकेमध्ये काम करायला आवडेल की नाही. तेव्हापासूनच माझे जीवन बदलून गेले. ज्यामुळे मला नेहमीची प्रक्रिया माहित नाही. पण, मला वाटते की आपण मनापासून जी इच्छा करतो, ती अखेर खरी ठरते.
मी गुप्त नियमाचे पालन करते, कारण माझा विश्वास आहे की विश्व नेहमीच ऐकत असते आणि तुम्हाला जे पाहिजे आहे किंवा तुमची जी महत्त्वाकांक्षा आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ती विश्वामध्ये निश्चित घडून येते. अर्थात, प्रतिभा असणे महत्त्वाचे आहे. पण कधीकधी इतर गोष्टी देखील महत्त्वाच्या ठरतात. म्हणून, सकारात्मक व अवधान केंद्रित राहणे आवश्यक आहे.
६. सर्व कलाकार व टीमसोबत मालिकेसाठी शूटिंग करण्याचा अनुभव कसा राहिला आहे?
टीम अत्यंत उत्तम आहे आणि मी प्रत्येकासोबत काम करण्याचा आनंद घेत आली आहे. दोन गोष्टी आहेत, पहिली म्हणजे सेटवर तरूणांचा उत्साह व ऊर्जा असतो आणि मला दररोज सेटवर असताना खूप आल्हाददायी वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक अनुभवी व्यक्ती देखील आहेत. ज्यामुळे त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळते. एकूण, प्रत्येकवेळी सेटवर अत्यंत आनंदी व सकारात्मक वातावरण असते आणि मला ते आवडत आहे.
७. तुला प्रेक्षकांना काय सांगावेसे वाटते?
प्रत्येकाने या मालिकेसाठी २०० टक्के योगदान दिले आहे आणि आम्हाला प्रेक्षकांनी नेहमीसारखेच अद्वितीय प्रेम देणे सुरूच ठेवायला आवडेल. मला खात्री आहे की ते मालिका पाहण्याचा भरपूर आनंद घेतील. कथा आधुनिक मुंबईमध्ये स्थित आहे आणि अत्यंत रोमांचक आहे. म्हणून, मी आशा करते की प्रेक्षक दररोज मालिका पाहतील आणि त्यांचे प्रामाणिक मत देतील, ज्यामुळे आम्ही अधिक उत्तमपणे काम करू.
