Saturday, June 13, 2026
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात रविवारी ३ हजार नवीन रुग्ण, तर ७० जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ७० रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच, आज ३ हजार ८३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के आहे. तसेच, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ८० हजार ४१६ वर पोहचली आहे.

सध्या राज्यात ७४ हजार १०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७ लाख ५७ हजार ५ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ४८ हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ नमुन्यांपैकी १८ लाख ८० हजार ४१६(१६.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी किमान तीन कंपन्यांच्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियंत्रकांकडूनआढावा घेतला जात असतानाच, येत्या ६ ते ८ महिन्यांत कोटय़वधी लोकांचे लसीकरण करण्याच्या मोहिमेची तयारी भारताने सुरू केली आहे.कोविड-१९ लशीच्या ६० कोटी मात्रा ३० कोटी भारतीयांना देण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा तैनात करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading