Sunday, May 31, 2026
PUNETOP NEWS

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत जयंत आसगावकर विजयी

पुणे, दि. 04- पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. जयंत आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading